प्रत्यय नाट्य महोत्सव – २०१९

प्रत्यय नाट्य महोत्सव २०१९ १५ ते १७ मार्च २०१९ केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर


कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत 
इंडोको रेमिडीज लि. प्रायोजित 
प्रत्यय नाट्य महोत्सव २०१९
१५ ते १७ मार्च २०१९ 
केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर 

दिनांक १५ ते १७ मार्च २०१९ दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे प्रत्ययचा तिसरा नाट्य महोत्सव संपन्न होत आहे. २०१७ पासून सुरु झालेल्या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून, कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट कडून तिनही वर्ष या महोत्सवासाठी अर्थसहाय्य आणि प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. यावर्षी इंडोको रेमिडीज लिमिटेड ह्या औषध क्षेत्रातील कंपनीने महोत्त्सवाचे प्रमुख प्रायोजकत्व स्वीकारले आहे. 
महोत्सवामध्ये चार नाटकांचे सादरीकरण होईल. तसेच गिरीश परदेशी ह्या प्रसिद्ध सिने- नाट्य दिग्दर्शकांसोबत १७ मार्च रोजी सकाळी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

महोत्सवाच्या संपूर्ण प्रवेशिकांचे दर कमी ठेवण्यात आलेले असून, रु. ५००/- आणि रु. ३००/- व बाल्कनी रु. २००/- असे चारही नाटकांसाठीचे शुल्क असणार आहे. त्याचबरोबर चारही नाटकांचे स्वतंत्र तिकीट देखील उपलब्ध आहे. 

महोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे नितीन अग्निहोत्री दिगदर्शित, चिन्मय मांडलेकर आणि हृषीकेश जोशी अभिनित नाटक जुगाड. हे नाटक रविवारी संध्याकाळी ४ वाजता केशवराव भोसले येथे सादर होईल.